शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

राज्यावर सूर्य कोपला! तापमानाचा पारा ४५ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 6:26 AM

पुण्यात शतकातील सर्वोच्च तापमानाची नोंद

पुणे : हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात व मध्य महाराष्ट्रावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने राज्यात उष्म्याची लाट आली आहे. पुणे शहरात गेल्या शतकातील सर्वोच्च ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान असून, अजून ही स्थिती दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचितशी घट होईल, मात्र राज्याचा पारा चाळीच्या आसपासच राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार ते पाच अंशांची वाढ नोंदविण्यात आली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानाचा पारा देखील वीस अंशांपुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवसाबरोबर रात्रदेखील उष्म्याचीच असेल. राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील किमान तापमानाचा पारादेखील २९.७ अंश सेल्सिअसवर आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमान ४५च्या वर गेले असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशादरम्यान आहे.राज्यात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर असल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.राज्यातील तापमानपुणे ४२.६, अहमदनगर, ४४.९, जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक ४१.७, सांगली ४३, सातारा ४१.६, सोलापूर ४४.३, उस्मानाबाद ४३.८, औरंगाबाद ४३, परभणी ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४, अमरावती ४५.४, बुलडाणा ४३.१, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.२, वाशिम ४४.२, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५.

टॅग्स :Temperatureतापमान