लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/भंडारा : कलम ३७० रद्द करून आम्ही जम्मू-काश्मीर व लडाखमधील नागरिकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र, विरोधक मात्र तेथील लोकांच्या भावना समजून न घेता शत्रू राष्टÑाची भाषा करत आहेत. त्यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी जाहीरनाम्यात कलम ३७० पुन्हा लावण्याचे आश्वासन द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांच्या जळगाव येथील कुसुंबा आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे जाहीर सभा झाल्या. आपल्या ४१ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, ५ आॅगस्टला आम्ही कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, परंतु दुर्दैवाने काही राजकीय पक्ष राष्टÑहिताच्या या निर्णयावर राजकारण करत आहेत. महाराष्टÑात हे पक्ष मत घेण्यासाठी फेऱ्या मारत आहेत, पण लोक त्यांना सोडतील का? असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे मोदी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, मी वचन दिले होते, संधी मिळाली तर स्थिर, स्वच्छ, सशक्त, संवेदनशील आणि ‘सबका साथ सबका विकास’ या सूत्रावर काम करणारे सरकार मिळेल. फडणवीस यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. तर दुसरीकडे थकलेले विरोधी पक्ष हे एकमेकांचा सहारा बनू शकतात. मात्र राज्यातील युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे साधन ते बनू शकत नाही.पवारांची उडविली खिल्लीसोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओबद्दल पवारांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, या व्हीडीओत नेता सोफ्यावर बसला आहे. काही कार्यकर्ते हार घेऊन येतात. ३-४ जण त्या नेत्याला हात धरून उठवतात. तो हार नेत्याच्या गळ्यात अडकवत असताना एक युवा कार्यकर्ताही त्यात डोक टाकतो. तेव्हा हा मोठा नेता कोपर मारून त्या युवकाला हटवितो. हा व्हीडीओ पाहून मी हैराण झालो. जो पक्षाच्या व्यासपीठावरील आपल्याच कार्यकर्त्याला मोठा होऊ देत नाही, तो तुमच्या मुलांना काय मोठा करेल? अशी टीकाही मोदी यांनी पवारांवर केली.
कोणाच्या, कुठे झाल्या सभा?पंतप्रधान नरेंद्र मोदीदोन सभा : कुसुंबा खुर्द, जि. जळगाव, साकोली, जि. भंडाराअमित शहा, भाजपतीन सभा: कोल्हापूर,सातारा, औरंगाबादरोड शो : शिरूर पुणेमुख्यमंत्री फडणवीसचार सभा : नांदुरा, वरकट बकाल, खामगाव (जि. बुलडाणा),वर्सोवा, मुंबईमॉर्निंग वॉक : नरिमन पॉइंट, मुंबईसभेत उपस्थिती : कुसुंबा खुर्द,जि. जळगावउद्धव ठाकरे, शिवसेनापाच सभा : सिल्लोड, परभणी, गंगाखेड, लोहा, कळमनुरीशरद पवार, राष्ट्रवादीचार सभा : अकोले, घनसावंगी, शेंदुर्णी- जामनेर, चाळीसगावराज ठाकरे, मनसेदोन सभा : मागाठाणे, दिंडोशी (मुंबई)
युवकांनी रोजगार मागितला; मोदींनी चंद्र दाखविला !मुंबई/औसा (जि. लातूर) : शेतकरी आत्महत्या करत आहेत, युवक रोजगार मागत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना कधी चंद्र तर कधी चीन, पाकिस्तान, जपान, कोरिया दाखवून लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. १५ उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ करून सरकारने सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा बुडविला, शब्दांत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.