मुंबई : रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले. तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यात अॅपे आॅटोला खडीने भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत नांदेडच्या १३ मजुरांसह १५ भाविक ठार व ३ जण गंभीर जखमी झाले़ तर, मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे शिवनेरी बस आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार तर चार जखमी झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील १८ मजूर आदिलाबादच्या निर्मलजवळील आडेली देवीच्या दर्शनाला आॅटोने जात असताना मध्यरात्री दहेगाव शिवारात समोरून येणाऱ्या टिप्परने (पान १० वर)(पान १ वरून) जोरदार धडक दिली़ त्यानंतर खडीने भरलेला हा टिप्पर उलटल्याने आॅटोचा चक्काचूरझाला. क्रेनच्या सहाय्यानेटिप्परला बाजूला करून मृतांना बाहेर काढले़यात गणपत आडेलू बाजेकर (५०), रतनबाई गणपत बाजेकर (४५), नरसिंग गणपत बाजेकर (३२), वंदना नरसिंग बाजेकर (३०), महानंदा दिलीप बाजेकर (२८), दीपा दिलीप बाजेकर (७), साई दिलीप बाजेकर (४),राजेश नरसिंग बाजेकर (२), शोभा राहुल बाजेकर (१९), प्रेम प्रल्हाद भालेराव (३), अर्चना सुरेश भालेराव (१०) ( सर्व जि़ नांदेड), प्रियंका गंगाधर दिवटेकर (१३) व आॅटोचालक बालू पोशट्टी संपागी (दोघेही तेलंगण), सुशीलाबाई बाबुराव गायकवाड (४५) व अर्जुन बाबुराव गायकवाड (११, दोघेही रा़ रामखडक, ता़उमरी, जि़नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर, राहुल गणपत बाजेकर (२२), दिलीप गणपत बाजेकर (३२), गंगाधर चन्ना ब्रम्हैया (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत़ लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठारराहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली़रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (४३), रचना जैन (४२), अर्चना शहा (४५, सर्व मध्य प्रदेश) व वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>शिवनेरी-कारचा अपघातमहाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे माणगाव तालुक्यातील रुद्रोली गावाजवळ पणजी-मुंबई शिवनेरी बस आणि एका मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांवर काळाने झडप घातली. डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय हे मंडणगड तालुक्यातील पेवे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोटारीतील संतोष तांबे (४३), स्वाती तांबे (३५), वृषभ तांबे (६), भिकूराम तांबे (७२) व प्रवीण पांडव (२९) मोटारचालक हे जागीच ठार झाले तर सूर्यकांत तांबे (४७), स्वप्निल तांबे (३५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
रविवार ठरला घातवार
By admin | Published: May 16, 2016 4:57 AM