शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

रविवारचे बाजार उठले

By admin | Published: June 05, 2017 12:59 AM

शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली. विशेष म्हणजे रविवारी असलेले सर्व आठवडेबाजार शेतकऱ्यांनी उठवले. यात कोणतेही व्यवहार होवू दिले नाहीत. जिल्ह्यात रविवारी बहुतांश ठिकाणचे मोठे आठवडे बाजार होतात. त्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील बाजार बंद ठेवण्यात आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आठवडे बाजारामध्ये शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उरुळी कांचन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. ४आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस न आणता संप सुरूच ठेवला. यामुळे उपबाजारात शुकशुकाट होता. दौंड तालुक्यातील केडगाव व खुटबावचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. आज सकाळी व्यापारी बाजारात दाखल झाले, मात्र शेतकऱ्यांनी बाजारतळांवर जावून त्यांना विनंती केली. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी ही विनंती मान्य केली व परत जाने पसंत केले. ४शिक्रापूर येथे दर रविवारी भरविला जाणारा आठवडेबाजार शेतकरी संपामुळे बंद ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ व्यापारी येथे बाजारात आले व बंद असलेला आठवडेबाजार सकाळी दहानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी आजच्या बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.४नसरापूर येथील आठवडेबाजार आज तुरळक गर्दीचा ठरला. बाजारपेठेत बाहेर गावातून येणारे बाजारकरी आले नाहीत. पालेभाज्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या नाहीत.चौथ्या दिवशीहीभाजीमंडई बंदइंदापूर येथे शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी शहरातील रविवारचा आठवडेबाजार, भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. माळवाडी नंबर दोनच्या युवा शेतकऱ्यांनी शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध व शेतीमाल ओतून दिला.अहो, आता आम्हाला थोडासा त्रास पडेल. पालेभाज्या आम्ही टाकून देऊ. घरी खाऊ अगर जित्राबांना खायला घालू. चार दिवस चार पैसे घरी येणार नाहीत. तेही सहन करू... पण जोपर्यंत चांगलं होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’- विनायक कदम, बेडशिंगे (इंदापूर) शेतकरींंंबारामती-इंदापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी शेतकरी संपामध्ये सहभागी होत रास्ता रोको आंदोलन केले.या वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, फळे, कांदे फेकत आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी शेतकऱ्यांनी केला.काही ठिकाणी मंबुई, पुणे व इतर जिल्ह्यात जात असलेला शेतीमाल रोखून धरला. आज मालाची नासधूस करण्यापेक्षा त्या वाहनांना परत माल जेथून आणला तिथे नेण्याची विनंती केली. ज्या वाहनचालकांनी ही विनंती मानली नाही, त्यांचा माल रसत््यावर फेकून देण्यात आला.