पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली असून मंगळवारी मतदानाच्या दिवशीही उन्हाचा कडाका कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ३८़८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी जळगाव येथे १४़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भात किमान तापमानात किंचित घट तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ६ अंशांने वाढ झाली आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात २ ते ३ अंश तर मराठवाड्यात ३ ते ४ अंश आणि विदर्भात ३ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)
मतदानादिवशी उन्हाचा कडाका
By admin | Published: February 21, 2017 4:27 AM