अतुल कुलकर्णी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रवेशासाठी ‘नीट’वर शिक्कामोर्तब केल्यानंतर नीट की सीईटी, हा तिढा सुटला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे. १० जून रोजी होणाऱ्या एमडी आणि एमएस या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ द्यायची की ‘सीईटी’ याविषयी येत्या दोन दिवसांत मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) निर्णय घेणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’ला दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता ‘नीट’चे वेळापत्रक सीबीएससी जाहीर करणार आहे. २४ जुलै रोजी परीक्षा होऊन १७ आॅगस्टपर्यंत ‘नीट’चा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. राज्यात १० स्वायत्त (डिम्ड) वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांच्याकडे एमबीबीएसच्या १६७५ आणि डेंन्टलच्या ९०० जागा आहेत. तर १५ खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या १७२० आणि डेन्टलच्या १७८० जागा आहेत. या सर्व जागांवरील प्रवेशसुद्धा ‘नीट’नुसारच होणार आहेत. ५ मे रोजी झालेल्या सीईटीनुसार आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, अॅक्युप्रेशर थेरपी, फिजीओथेरपी, बीएस्सी नर्सिंग, फार्मसी, व्हेटरनरी आणि इंजिनिअरिंगचे २०,८३० प्रवेश दिले जाणार आहेत.ज्यांनी ‘नीट’ दिली त्यांना आणखी एक संधी १ मे रोजी राज्यात ‘नीट’चा पहिला टप्पा पार पडला. त्यासाठी ७० हजार विद्यार्थी बसले होते. परंतु ज्यांना अभ्यासाला वेळ मिळाला नसेल त्यांना पुन्हा २४ जुलै रोजी होणाऱ्या ‘नीट’साठी बसता येईल. तशी परवानगी सर्वाेच्च न्यायालयाने दिली आहे. ज्यांना ‘नीट’ दुसऱ्यांदा द्यायची ते देऊ शकतील; पण दुसऱ्या परीक्षेत जर पहिल्या परीक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर मात्र कमी पडलेले गुण गृहीत धरले जातील. त्यामुळे ही संधी घ्यायची की नाही हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे.वाहिन्यांवरून अभ्यास घेणार - तावडेराज्यातल्या ‘सह्याद्री’सह विविध वाहिन्यांचे काही दिवस रोज एक तास विकत घेतला जाईल आणि त्यावरून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मुलांना देता येईल. त्यासाठी किती खर्च येईल याचा आढावा व त्यासाठी काय तयारी करावी लागेल यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याशी आपले बोलणे झाले असून, ‘सह्याद्री’वरचा एक तास देण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे तावडे यांनी सांगितले.अभ्यासक्रमकॉलेज प्रवेश क्षमताबीई इंजिनीअरिंग३६७१,५३,८००फार्मसी१६११०,७७०आयुर्वेद६२३३०५होमिओपॅथी४५३१४५युनानी५२७०फिजीओथेरपी३५१०९५अॅक्युप्रेशर थेरपी६१५०नर्सिंग४७२०३५बीएएसीएलपी३४५बीपीओ११५
सुपर स्पेशालिटीचा निर्णय दोन दिवसांत
By admin | Published: May 11, 2016 4:21 AM