शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१३ हजार ३३२ मेट्रिक टन शेतमालाचा पुरवठा

By admin | Published: June 07, 2017 3:36 AM

ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे

सुरेश लोखंडे। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी राज्यातील बळीराजाने मागील सहा दिवसांपासून राज्यात संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ताज्या भाजीपाल्यापासून वंचित राहावे लागले. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये १३ हजार ३३२ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजीपाल्याचा ट्रक भरून शेतमाल मंगळवारी पहाटे ४ वाजता धडकल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी शेतकऱ्यांनी राज्यभर बंद पाळलेला असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाणे, मुंबईकरांसाठी ताजा भाजीपाला मंगळवारी पहाटेच पोहोच झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या संपाची दाहकता आता कमी झाली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर आदी जिल्ह्यातून तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातूनदेखील भाजीपाला व अन्नधान्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे होलसेल मार्केटमधील माल सकाळीच किरकोळ बाजारपेठांमध्ये आल्यामुळे ठाणेकरांसह मुंबईकरांना बळीराजाने सुखद धक्का दिला. एमपीएमसी मार्केटसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड येथील होलसेल मार्केटमध्ये घेवडा, वांगी, टोमॅटो, वाटाणा, शिराळी, सुरण, शेवगा, गाजर, काकडी, बटाटा, कांदा, या भाज्यासह मेथी, पालक, मुळा, शेपू, कोथिंबीर, कांदापात, कडीपत्ता इत्यादी पालेभाज्या होलसेल बाजारभावाने विकला गेल्या. हाच भाजीपाला आजच्या किरकोळ बाजारपेठेत थोड्या चढ्या दराने म्हणजे ७० ते १२० रूपये किलोने ग्राहकांना विकण्यात आला. हा तर बुधवारी मात्र हे भाव खाली आलेले दिसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कल्याणच्या बाजारपेठेत ५३ ट्रक व ६५ टेम्पोव्दारे पाच हजार ९५३ मेट्रिक टन अन्नधान्य व भाजापाला आला. राज्यातील १०१ आणि अन्य राज्यातील २८ ट्रक -टेम्पोतून हा शेतीमाल ठाणे , कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी आला आहे. कांदा-बटाटा १५७० क्विंटल, भाजीपाला २१५५, फळे ८८२ आणि ११३६ क्विंटल अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. भिवंडी मार्केटमध्ये २० टेम्पो, १० ट्रकदारे १०० टन भाजीपाला आला. मुरबाडला पाच टन भाजीपाला आणि २४ टन कांदा-बटाटा आला आहे. सरळगावच्या मंगळवारच्या बाजारात या मालाची उपलब्धता झाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.वाशीच्या एपीएमसीमध्ये १५७ गाड्यांव्दारे २,३३४ टन कांदा- बटाटा आला आहे. ३५४ गाड्यांनी २,५८० टन फळांची आवक झाली. ४२९ गाड्यांनी २४८० टन भाजी आणि २०२ गाड्यांनी ४७७८ मेट्रिक टन अन्नधान्याची आवक बाजारात झाली आहे. बुधवारनंतर राज्य व परराज्यातून अन्नधान्य व भाजीपाल्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढणार आहे. यामुळे भावाची घसरणही होईल. परंतु, मागील चार दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचा भाव मंगळवारी बाजारात कमी होता. किरकोळ व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा करून तो काही प्रमाणात चढ्या दराने विकला. मात्र, हे भावही लवकरच घसरण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.