शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

जाहिरातीतील उत्पादनांचा पुरवठा करा!

By admin | Published: May 06, 2016 5:30 AM

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे.

- यदु जोशी,  मुंबई

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ज्या उत्पादनांची जाहिरात टी.व्ही. अथवा रेडिओवर येते, अशीच उत्पादने खरेदी करण्याची अजब अटही निविदांमध्ये टाकली आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना नित्य उपयोगाच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अमरावती, नागपूर, नाशिक, ठाणे या चार आदिवासी विकास विभागांमध्ये सुमारे २८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांची उत्पादने मिळावी हा हेतू असला तरी त्याआडून विशिष्ट कंपन्यांचीच उत्पादने वापरण्याचा आग्रह कशासाठी धरला जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हँडवॉश लिक्विड, फिनाईल, टूथब्रश, डिटर्जंट पावडर, सॅनिटायझर, भांडी धुण्याचा साबण याबाबतीतदेखील विशिष्ट कंपन्यांचीच नावे निविदेत नमूद करण्यात आली आहेत. विशिष्ट ब्रँडवर मेहरनजर ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रामदेवबाबांचं चांगभलं- २,६६,३२० टूथपेस्ट पुरविताना त्या कोलगेट, ओरल-बी, दंतकांती, पेप्सोडंट वा क्लोज अप कंपनीच्याच असाव्यात, अशी अट घातली आहे. दंतकांती ही रामदेवबाबांच्या पतंजलीची टूथपेस्ट आहे. - अमरावती विभागाने दिलेल्या जाहिरातीत अंघोळीचा साबण लाइफबॉय, सिन्थॉल, लक्स, रेक्सोना किंवा समकक्ष कंपन्यांचा असावा, असे म्हटले आहे. समकक्ष म्हणजे काय याची कुठलीही व्याख्या देण्यात आलेली नाही. कपडे धुण्याचा साबण रिन, सर्फ एक्सेल, टाईडचाच असावा, असे नमूद आहे.काही कंपन्यांची नावे निविदेत नमूद करण्यामागे विद्यार्थ्यांना ब्रँडेड वस्तू मिळाव्यात हाच उद्देश आहे. मात्र, त्यातून विशिष्ट कंपन्यांवर मेहरनजर ठेवली जात असल्याचे प्रतीत होत असल्याने निविदेत बदल करून केवळ ‘ब्रँडेड’ वस्तू पुरविण्याची अट टाकली जाईल. - विष्णू सवरा, आदिवासी विकास मंत्री