वाशिम : शासनाच्या सर्व अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थींना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. आधार क्रमांक संकलित केल्यानंतर, जिल्हास्तरावर त्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया महिनाभरापासून सुरू झाली आहे. मात्र, अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांत या योजनेचे ७० टक्केही काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या लाभार्थ्यांना आधार क्रमांक सादर करणे सक्तीचे आहे. लाभार्थींकडून आधार क्रमांक संकलित करण्यात आल्यानंतर खऱ्या, खोट्या लाभार्थींचा शोध घेणे, तसेच चुका दुरुस्त करण्यासाठी या आधार क्रमांकाची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनुक्रमे ९४.२४ आणि ९४.२६ टक्के पडताळणी पूर्ण झाली. (प्रतिनिधी)वाशिम जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर आधार क्रमांकांची पडताळणी करून या सर्वांसाठी अनुदान वितरितचा मार्गही मोकळा करण्यात आला. ही प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे थांबल्याने किंचित विलंब लागला. हे काम येत्या दोन दिवसांतच पूर्ण होईल.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम.
अमरावती विभागात आधार पडताळणी संथ
By admin | Published: February 22, 2017 4:21 AM