शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राहुल देशमुखसह अन्य अपात्र नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

By admin | Published: July 11, 2016 9:13 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपात्रतेचा आदेश कायम ठेवल्यामुळे काटोलचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख व काही नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 11-  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपात्रतेचा आदेश कायम ठेवल्यामुळे काटोलचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख व काही नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय कुरियन जोसेफ व आर. एफ. नरिमन यांनी सोमवारी ही याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. परिणामी देशमुख यांच्यासह इतर अपात्र नगरसेवकांना जोरदार दणका बसला आहे.या नगरसेवकांनी विविध विकास कामांत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप जितेंद्र तुपकर व चरणसिंग ठाकूर यांनी केला होता. तसेच, यासंदर्भात नगर विकास मंत्र्यांकडे तक्रार सादर केली होती. त्यावेळी राहुल देशमुख नगराध्यक्ष होते. नगर विकास मंत्र्यांनी तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नगर परिषद कायद्यातील कलम ३११ अंतर्गत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. नगर विकास मंत्र्यांनी २० फेब्रुवारी २०१६ रोजी आदेश जारी करून राहुल देशमुख, सरला उईके, आशा राऊत, वंदना राजुरकर, शोभा जवंजाळ, नलिनी लारोकर, सुरेश पर्बत, गीता चांडक, राजेश डेहनकर व गिरीश पालिवाल यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायदा-१९६५ मधील कलम ५५ब व ४२ अंतर्गत अपात्र ठरविले होते. या आदेशाविरुद्ध नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी ६ मे २०१६ रोजी याचिकेवर निर्णय देऊन गिरीश पालिवाल वगळता अन्य नऊ नगरसेवकांची अपात्रता कायम ठेवली. या नऊपैकी राहुल देशमुखसह काही नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण त्यांना दिलासा मिळाला नाही.