विश्वास पाटील- कोल्हापूर : पुरोगामी विचारवंत डॉ एम एम कलबुर्गी यांच्या खून प्रकरणी तपासामध्ये अजिबात प्रगती नसल्याच्या कारणावरून सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेकर्नाटक पोलिसांना चांगलेच फटकारले.
या तपासाचे नियंत्रण मुंबई उच्च न्यायालयाकडे का देऊ नये अशी विचारणा न्यायालयाने केली. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी न्यायाधीश रोहिंगटन नरिमन आणि नविनकुमार सिन्हा यांच्यासमोर झाली.कलबुर्गी कुटुंबियांच्यावतीने श्रीमती कलबुर्गी यांनी ही याचिका केली आहे. त्यांच्या वतीने ऍड अभय नेवगी यांनी बाजू मांडली.
या खून प्रकरणात तपासात शून्य प्रगती असल्याचे नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले..त्यावर न्यायालय भडकले आणि या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाचे नियंत्रण का ठेवू नये अशी विचारणा केली..ऍड नेवगी यांनीही तसाच आग्रह धरला. दोन आठवड्यात काय तपास केला याबद्धल ठोस प्रतिज्ञापत्र घालावे आणि त्यावेळी आम्ही पुढील निर्णय घेऊ असे न्यायालयाने बजावले.