शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

‘हमीदवाडा’ची याचिका ‘सुप्रीम’ने फेटाळली

By admin | Published: January 08, 2015 12:51 AM

हसन मुश्रीफ यांची माहिती : संताजी घोरपडे साखर कारखान्याचे गाळप रोखण्यास नकार

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबाबत हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली, अशी माहिती संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक, आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. घोरपडे काखान्यामुळे परिसरात प्रदूषण होते, कारखान्याचे गाळप रोखावे, अशी मागणी हमीदवाडा कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत घोरपडे कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर कारखान्याचे गाळप सुरू झाले, पण हमीदवाडा कारखाना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी व संताजी घोरपडे कारखाना बंद करावा, अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर आज, दि. ७ सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मुखोपाध्याय व न्या. रमण्णा यांच्या खंडपीठाने हमीदवाडा साखर कारखान्याची याचिका फेटाळली. उच्च न्यायालयाने केलेला एक लाख रुपये दंड कमी करावा, अशी विनंती हमीदवाडा कारखान्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर संताजी घोरपडे कारखान्याचे अ‍ॅड. हरेण रावळ यांनी हमीदवाडा कारखान्यांचा दंड कमी करण्यास सहमती दिली. घोरपडे कारखान्याच्यावतीने अ‍ॅड. हरेण रावळ, अ‍ॅड. जैन, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी काम पाहिले तर हमीदवाडा कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. सिब्बल, अ‍ॅड. त्रिवेदी, अ‍ॅड. सटाले यांनी काम पाहिल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.