शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार; राज्यातील ६० प्रकल्पांना १०४ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 7:52 PM

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते.

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील ६० महापालिका, नगरपालिकांमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने एकत्रित १०४ कोटी रुपये वितरित केले आहेत. यात विदर्भातील १८ नगरपालिकांचाही समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केले होते. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून राज्यातील अनेक महापालिकांनी बांधकाम परवानगी थांबविली होती. मात्र, असा कुठलाही आदेश काढला नसल्याने कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने परस्पर आदेश जारी करणे योग्य नसल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने राज्यातील ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य व केंद्र शासनाने १०४ कोटी रुपये देण्यास २७ सप्टेंबर रोजी हिरवी झेंडा दाखवला.

 यात केंद्राचे ६२.६८ कोटी रुपये, तर ४१.७९ कोटी रुपये राज्याचा हिस्सा आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने ६० शहरांचे ३५८.२२ कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर केले होते. त्यात केंद्र शासनाचा अनुज्ञेय हिस्सा १२५.३८ कोटी असून, त्यापैकी ६० टक्के अर्थात ६२.६८ कोटी रुपये राज्यास दिला आहे. केंद्र शासनाच्या या हिश्श्यासह राज्याने ४१.७९ कोटी रुपये स्वहिस्सा टाकत एकूण रक्कम ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याचे आदेश स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या राज्य संचालकांना दिले आहेत. 

 

या शहरांना मिळाला निधीकोल्हापूर, उल्हासनगर, लातूर, नांदेड, परभणी, आर्णी, दिग्रस, नेर, अकोट, बुलडाणा, चिखलदरा, दारव्हा, मेहकर, पातूर, शेगाव, तेल्हारा, उमरखेड, बीड, उस्मानाबाद, उदगीर, हिंगोली, परळी, पाथरी, मानवत, जालना, भूम, देगलूर, वैजापूर, नळदुर्ग, गंगाखेड, परतूर, पूर्णा, भोकरदन, परांडा, सेलू, मुरुम, राजापूर, पालघर, बल्लारपूर, भद्रावती, गडचिरोली, साकोली, कन्हान, वानाडोंगरी, नवापूर, राहुरी, वरणगाव, शहादा, जामखिंड, श्रीगोंदा, तळोदा, शेवगाव, इचलकरंजी, जुन्नर, अक्कलकोट, करमाळा,  शिरूर, आष्टा, तासगाव

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार