मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या इंदापूर मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत पेच निर्माण झाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी कमळ हातात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का अशी विचारणा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात आक्रमक मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली. त्यावर तोडगा न निघाल्याने अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची वाट धरली. दरम्यान, काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीवरून सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. आहे. दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का, अशी विचारणा त्यांनी केली. हर्षवर्धन पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत भांडण होते. मग त्यांनी त्या रागातू काँग्रेस का सोडली, अशा रोखाने त्यांनी विचराणा केली.
दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 6:04 PM