शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

मोदींवर सुप्रिया सुळे बरसल्या

By admin | Published: October 06, 2014 4:36 AM

सध्या काही पक्षाचे दिल्लीहून आयात केलेले नेते महाराष्ट्रात येवून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत

बुलडाणा : सध्या काही पक्षाचे दिल्लीहून आयात केलेले नेते महाराष्ट्रात येवून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्राचे रहिवासी आहोत; पण पवार कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असाल पंतप्रधान, पण खोटे आरोप कराल, तर तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला व फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालत असलेला महाराष्ट्र, देशात एक नंबरचे राज्य असताना, महाराष्ट्राने मान खाली घालावी अशी राज्याची बदनामी सुरू आहे. महाराष्ट्र सर्वात मागे आहे, असे म्हणणाऱ्यांनी जे स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. त्याची मुहूर्तमेढ याच महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी केली होती. त्याला पंधरा वर्षापूर्वी आर. आर. पाटील यांनी मूर्त स्वरूप दिले होते. देशाला रोजगार हमी योजना याच महाराष्ट्राने दिली. इको व्हिलेज योजना जयंत पाटील यांनी सुरू केली. माहिती नसेल तर माहीत करून घ्या, मात्र खोटे आरोप करू नका, असा सल्ला खा. सुळे यांनी दिला. निवडणूका आहेत, आमच्या महाराष्ट्रात तुमचा सन्मान आहे. तुम्ही या, भाषण करा, आमचे चुकत असेल तर निश्चित आमच्यावर टीका करा. आम्हाला तेही मान्य आहे. मात्र यापूर्वीही शरद पवार यांच्यावर अनेकवेळा खोटे आरोप झाले. ट्रकभर पुरावे देतो, अशी गर्जना करणाऱ्यांना त्यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. आता पुन्हा महाराष्ट्राला उल्लु बनवत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात सुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)