Video : गोडबोल्यापेक्षा कडक बोलणारा माझा दादाच चांगला - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 09:04 PM2018-02-19T21:04:13+5:302018-02-19T21:05:10+5:30
खरं बोलल्यामुळे दादा कधी कधी अडचणीत ही येतो, पण खोटं बोलत नाही. गोड बोलणार्यापेक्षा थोडा कडक बोलणारा माझा दादाच चांगला
अमळनेर : गोड बोलून मोठी स्वप्न दाखवणाऱ्यांकडून आता सावध रहा. एक वेळ कडू बोलणारा चालेल पण गोड बोलणारा नको. जसा आमचा दादा कडक बोलतो पण खरं बोलतो. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल कर आता दादाच हवा, असे प्रतिपादन करून सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या वृत्तीवर टीका करत अजितदादांचे कौतुक केले.
मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीजी दोन मिनिटे महाराष्ट्राबद्दल बोलले आणि उरलेले २२ मिनिटे देशातील इतर गोष्टींवर बोलत मोठ मोठी स्वप्ने दाखवत बसले. बेरोजगार, कर्जमाफी, हमीभाव याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. आता आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असं इशारा देत त्या पुढे म्हणाला, गोड बोलणार्यापेक्षा थोडा कडक बोलणारा, शिस्तप्रिय असा माझा दादाच चांगला आहे. खरं बोलल्यामुळे दादा कधी कधी अडचणीत ही येतो, पण खोटं बोलत नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे कौतुक केले.
सुप्रिया ताई म्हणतात माझी आई सामान्य गृहिणी, महागाइची तिलाही झळ -
खरे वाटणार नाही ना? पण हे खरे आहे. हा किस्सा स्वतः सांगीतला आहे हे सुप्रिया सुळे यांनी. अमळनेर येथील सभेत त्या म्हणाल्या, माझी आई सामान्य गृहिणी असून ती आज देखील पिशवी घेऊन बाजारात भाजी विकत घ्यायला जाते. स्वतः गॅस बुक करते. आज भाजीपाल्यापासून गॅस पर्यंत महागाई वाढलेली आहे. तेव्हा आई मला म्हणते, 'तुमच्या काळात एवढी महागाई नव्हती, आज खुपच महागाई असून पैशांची बचतच होत नाही', अशी माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आज अमळनेर येथे तेराव्या सभेसाठी त्या उपस्थित असताना बोलत होत्या. "काहींचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की शरद पवार यांची बायको बाजारात स्वतः भाजी आणायला जाते. आघाडी सरकारची सत्ता होती तेव्हा टिव्हीवर भाजपची जाहीरात लागायची, 'बोहोत हुई मंहगाई की मार... " तेव्हा आई म्हणायची तुमच्या राज्यात किती महागाई झाली". मी आणि साहेब गपचीप ते ऐकून घ्यायचो, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.
त्या पुढे म्हणाल्या, "सध्या तथाकथित अच्छे दिनचे राज्य आले आहे, तेव्हा मी तिला विचारते की आज काय परिस्थिती आहे. तर ती म्हणते, जुनी परिस्थितीच चांगली होती. तुमच्या राज्यात बचत व्हायची ती देखील आज होत नाही".
हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित महिलांमध्ये एकच हशा पिकला, जणू प्रत्येक घरातील परिस्थिती सुप्रियाताई कथन करत होत्या.
पाहा व्हिडीओ -