शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 9:09 PM

'पक्ष बळकावण्याची गरज नव्हती.'

Supriya Sule on Ajit Pawar : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासह विविध मुद्यांवर खलबतं सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवारांबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. 'मागितले असते, तर सर्व काही दिले असते, पण पक्ष बळकावण्याची गरज नव्हती,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, 'आम्हाला अजित पवारांना पक्षात ठेवायचे होते, पण त्यांनी आमचे आयुष्य विस्कळीत करुन सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक आमदारांना सोबत घेऊन त्यांनी पक्ष फोडला. त्यांनी मागितले असते, तर सर्व काही देऊन टाकले असते, पण पक्ष बळकावण्याची गरज नव्हती,' असे सुप्रिया यावेळी म्हणाल्या.

अजित पवारांना बाजूला सारून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे नेतृत्व करायचे होते, असा आरोप केला जातो. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्यात मला आनंदच झाला असता. मी कधीही पक्षाचे नेतृत्व करण्याची मागणी केली नाही. अजित पवारच यासाठी प्रयत्न करत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मला मुख्यमंत्री व्हायचं आहे-अजित पवारदरम्यान, याच कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री बनायचे आहे. पण आमची गाडी तिथेच अडकते, त्याला काय करणार. पुढे जाता यावे, यासाठी मी प्रयत्न करतो, मात्र संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला संधी चालून आली होती, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने ती गमावली. प्रयत्न करणे प्रत्येकाचे काम आहे. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची एकच जागा आहे आणि जो 145 आमदाराचं समर्थन मिळवेल, तो मुख्यमंत्री बनेल. माझी महत्त्वाकांक्षा काय आहे हे मी आता सांगणार नाही. सध्यातरी आमचे लक्ष्य महायुतीच्या रूपात पुन्हा सत्तेत येणे हेच आहे, असे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार