सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:04 PM2023-05-03T12:04:31+5:302023-05-03T12:05:32+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे.

Supriya Sule to become the president of NCP? Announcement likely today | सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करत पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचं ठरवले. शरद पवारांच्या या घोषणेने राष्ट्रवादी नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला. शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. काही ठिकाणी कार्यकर्ते उपोषणाला बसले तर काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २-३ दिवस विचार करू असं शरद पवारांनी सांगितले. मात्र आता राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षातील नेत्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. इतकेच नाही तर बैठकीनंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होईल त्यात सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणाही होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्याशिवाय अजित पवार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. अजित पवार हे केंद्रात नेतृत्व करण्यास इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे. त्यात राज्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व आहे. अजित पवार यांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रीय राहणार तर सुप्रिया सुळे केंद्रात पक्षाचे नेतृत्व करतील असं सांगितले जात आहे. 

सुप्रिया सुळे अनेक वर्षापासून दिल्लीत सक्रीय आहेत. वेगवेगळ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अकाली दल, द्रमुक यासारखे पक्षातील वारसदारही त्यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे या जमेच्या बाजू आहेत. तर अजित पवार यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळले आहे. त्यामुळे आमदारांना बांधून ठेवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला तरी पुन्हा पक्षात आल्यानंतर आमदारांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी अजितदादांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे अजित पवार हे राज्यात पक्षसंघटना बांधणीसाठी सक्रीय राहतील असं राजकीय चर्चा सुरू आहे. 

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकतो
संसदीय कामकाजात सुप्रिया सुळे उत्तम काम करतायेत. अनेक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. देशभरात त्यांचा प्रवास आहे. अनेक ठिकाणी त्या प्रचाराला जात असतात. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाने पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रपक्षही सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाचे स्वागत करतील असा विश्वास राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Supriya Sule to become the president of NCP? Announcement likely today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.