शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 11:03 AM

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

Supriya Sule Mahayuti : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी राज्यात राजकीय प्रचार हळूहळू जोर धरू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबद्दल केलेल्या एका विधानावरून सुप्रिया सुळेंनीमहायुतीवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की, त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय."

ज्योतिबा फुलेंचा विचार, महायुतीला टोला

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात, "थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते -'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।" 

हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे -सुप्रिया सुळे

"खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय बोलले?

"आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते, तिला गोगलगायीची पावले असतात. ती गोगलगायीच्याच पावलाने पुढे जाते, तिला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काहीच पुढे जात नाहीत. अर्थसंकल्पात आपण विद्यापीठाची घोषणा केली. शासन निर्णय काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की, पहिले मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी