शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”
2
मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; Rohit Sharma च्या आईची भावनिक पोस्ट
3
6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले
4
लोकसभेत राहुल गांधी बोलण्यास उभे राहताच माईक बंद होतो? आरोपांमुळे ओम बिर्ला संतप्त, म्हणाले...
5
‘फॉर्म २६ एएस’ म्हणजे काय रे भाऊ! का आहे तो महत्त्वाचा, कुठून कराल डाऊनलोड?
6
भारत जिंकला म्हणून आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, BJP च्या मागणीवरून विरोधकांचा गोंधळ
7
"मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीनं करावा...", पत्नीची विचित्र मागणी
8
तुमच्या मुलांना तुम्ही चहा-बिस्किट देता का?; होऊ शकतं मोठं नुकसान, पालकांनो व्हा सावध
9
पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले
10
'हे न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण ...', गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांबाबत सांगितलं
11
कपूर खानदानातला 'हा' व्यक्ती अभिनेता म्हणून 'सुपरफ्लॉप' पण बिझनेसमन म्हणून 'सुपरहिट'!
12
"फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
13
'धनंजय मुंडे यांच्या राईट हॅन्डने बबन गित्तेंना अडकवलं'; रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?, नाना पटोलेंचा सवाल
15
अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव, CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान
16
जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!
17
लंडनमध्ये प्रिया बापटवरून उमेश कामतचं एका व्यक्तीसोबत जुंपलं भांडण, व्हिडीओ व्हायरल
18
एअरटेलसह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, वाढवलं टार्गेट प्राईज; करू शकतात मालामाल
19
Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"
20
अगर किसी चीज को शिद्दत से चाहो... रोहितचा वर्ल्डकप ट्रॉफीसोबत खास फोटोशूट, पाहा Photos

सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 8:51 PM

Suraj Nikam death News: नागेवाडीत राहत्या घरी घेतला गळफास : कुस्ती क्षेत्रात खळबळ

- दिलीप मोहिते

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला नागनाथनगर - नागेवाडी (ता. खानापूर) गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पै. सुरज जनार्दन निकम (वय ३०) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

नागेवाडी ( नागनाथनगर) येथील सुपुत्र पै. सुरज निकम याने अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करुन आपला दबदबा निर्माण केला होता. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना आस्मान दाखवले होते. त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नावलौकिक निर्माण केला होता. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.

पै. सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यतीत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या राहत्या घरातील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी पै. सुरज याला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकम याचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैलवान सुरजचा भाऊ आसाम येथे व्यवसायनिमित्त असल्याने ते आल्यानंतर शनिवारी दुपारी पै. सुरज निकम याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्ती