शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सूरजचा मित्र दडला कुठे?

By admin | Published: September 21, 2014 1:12 AM

कारागृहातून पळाल्यानंतर लगेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा कैदी सूरज श्याम अरखेल याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त केले. त्याला पळून जाण्यास मदत

आकाशसाठी जागोजागी चौकशी : तीन मोबाईल अन् चार सीम जप्तनागपूर : कारागृहातून पळाल्यानंतर लगेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा कैदी सूरज श्याम अरखेल याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त केले. त्याला पळून जाण्यास मदत करणारा आकाश मात्र कुठे गडप झाला, ते कळायला मार्ग नाही. आकाशचा छडा लावण्यासाठी सदर पोलीस जंग जंग पछाडत आहेत. सूरजने कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन अगदी एखाद्या सिनेमातील खलनायकासारखाच बनवला. त्याचमुळे कारागृहाचे प्रवेशद्वार ओलांडताच त्याच्यासमोर आकाश आपला आॅटो घेऊन उभा होता. हा आॅटो सदरमध्ये शाळेजवळ पोहचला तेव्हा त्याची अल्पवयीन प्रेयसीही वाट पहात होती. सदरमधून निघाल्यानंतर ते मूर्तिजापूरला पोहचले.केवळ अमरावतीत त्यांनी एकदाच नाश्त्यासाठी थांबा घेतला. मूर्तिजापूरच्या नाक्यावर रोशन मारवे (आत्याचा मुलगा) वाट बघत होता. (कारागृहातून सूरज पळून आला किवा त्याने सोबत आणलेली मुलगी अल्पवयीन आहे, याची त्याला माहिती नव्हती, असे म्हणतात!) घरी पोहचल्यानंतर या तिघांची रोशनने सरबराई केली. आॅटोचालक आकाश मात्र तेथून भल्या सकाळीच सटकला. सदर पोलिसांनी सूरज अन् त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. सूरजच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि तीन सीमकार्ड तसेच ‘तिच्या‘ ताब्यातून एक मोबाईल आणि एक सीमकार्ड पोलिसांनी जप्त केले. त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारा आॅटोचालक आकाश अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. आकाश वापरत असलेले मोबाईलचे सीमकार्ड भलत्याच्याच नावावर आहे. त्यामुळे त्याला शोधण्यात अडचण येत असल्याचे समजते. सदरचे पोलीस निरीक्षक जी. के. राठोड, द्वितीय निरीक्षक राजेंद्र मछिंदर आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)कारागृह हादरले, अधिकारी गप्प!खुनाच्या आरोपातील एक कैदी दिवसाढवळ्या कारागृहातून पळून गेल्यामुळे आणि त्याच्याकडून कारागृहातील धक्कादायक प्रकारांची माहिती उघड होण्याची दाट शक्यता असल्यामुळे कारागृह प्रशासन हादरले आहे. गृहमंत्रालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. कारागृहातील वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहे. वारंवार संपर्क करूनही कुणीच काही बोलायला तयार नाही.