शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

By admin | Published: August 02, 2015 11:15 PM

सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

सदानंद औंधे - मिरज -युतीचे शासन सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण होत आल्यानंतरही मंत्रिपदावर वर्णी न लागल्याने आ. सुरेश खाडे यांच्या गोटात अस्वस्थता आहे. भाजप नेत्यांच्या दुर्लक्षामुळे आ. खाडे यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना मंत्रिपदासाठी साकडे घातले आहे. भाजपतर्फे जिल्ह्यात राखीव मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून येणाऱ्या आ. सुरेश खाडे यांचा मंत्रिपदावर दावा आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर आ. खाडे पालकमंत्री असल्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या. समाजकल्याण विभाग नको, तर सार्वजनिक बांधकाम विभाग हवा असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी आ. खाडे यांचे मंत्रिपदाच्या शर्यतीत नाव होते; मात्र कोठे तरी माशी शिंकली आणि आ. खाडे यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. खाडे हे मुंडे गटाचे असतानाही आ. खाडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. याबाबत खाडे समर्थकांत नाराजी आहे. जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सख्य आहे. मात्र मिरजेतील काही प्रमुख पदाधिकारी आ. खाडे यांना विरोध करीत असल्याचे समर्थकांची तक्रार आहे. या कारणावरून काही दिवसांपूर्वी वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडले होते. खा. संजय पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही आ. खाडे गटाचे फारसे सख्य नाही. मिरजेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रश्नावरून खासदार, आमदारांत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. खाडे यांना मंत्रीपद मिळवून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेसुध्दा सूचक मौन बाळगून आहेत. अन्न व औषधमंत्री गिरीश बापट, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी आ. खाडे यांची जवळीक आहे. सांगली जिल्ह्यात पाच आमदार निवडून येऊनसुध्दा भाजपचा एकही मंत्री नसल्याने आ. खाडे यांना मंत्रीपद देण्यात आले नसल्याने आ. खाडे समर्थक निराश आहेत. कार्यकर्त्यांचा मंत्रिपदाचा आग्रह असल्याने आ. खाडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संपर्क साधला आहे. पुणे येथे शंकर अभ्यंकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक भागवत यांच्याहस्ते झाले. यावेळी सरसंघचालकांची भेट घेऊन आ. खाडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याबाबत चर्चा केली. सरसंघचालकांमार्फत आ. खाडे मंत्रीपद मिळविण्यात यशस्वी होणार का? याबाबत मिरजेत भाजप कार्यकर्त्यांत चर्चा रंगली आहे.दबावासाठी प्रयत्न!चर्चेचा अधिक तपशील समजू शकला नाही, मात्र यानिमित्ताने मंत्रिपदासाठी संघाकडून भाजप नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी आ. खाडे यांचा प्रयत्न असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.