नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फ सविल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी ८ जुलैपर्यंत जामीन कायम ठेवला आहे़ या प्रकरणात जबाब घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची मागणी भद्रकाली पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती़देवळाली शिवारातील जमीन खरेदीचे हे प्रकरण आहे़ जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत वाडकर यांनी स्वत:च्या नावे लिहून घेतली, अशी तक्रार याचिका हेमंत कोठीकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता़ वाडकर यांनी वकिलांमार्फ त २८ जूनला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. (प्रतिनिधी)
सुरेश वाडकरांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम
By admin | Published: July 02, 2014 4:23 AM