लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : विधानसभा निवडणूक यापुढे लढविणार नाही, या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विधानाचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. सुरेशदादांनी लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेचे पर्याय खुले ठेवले असले तरीही विधान सभेचाही पर्याय खुला ठेवावा, या मागणीसाठी विविध संस्था, संघटना, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत त्यांना साकडे घातले. रविवारी सुरेशदादांनी ‘मी ९ वेळा शहराचा आमदार राहिलो आहे, जळगावकरांनी मला भरपूर प्रेम दिले. भविष्यात मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही.’ असे विधान केले होते. कार्यक्रमाला उपस्थित भाजपाचे आ. सुरेश भोळे यांना उद्देशून ते म्हणाले, की मी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याने तुम्ही भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यानंतर जळगावातील नागरिक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्या संघटना व कार्यकर्त्यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन साकडे घालण्यासाठी रीघ लावली आहे. सुरेशदादा हे प्रत्येक शिष्टमंडळाची भेट घेत असून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे.
सुरेशदादांनी विधानसभेचाही पर्याय खुला ठेवण्याची मागणी
By admin | Published: May 10, 2017 2:18 AM