पुणे : पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्कार केला आहे. आपण असे बोललो नव्हतो, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, सर्वपक्षीय बैठकीत आपण या हल्ल्याचा संमती दिली होती, असे पवार यांनी आता म्हटले आहे. फेसबूक पेजवर पोस्ट करून पवार यांनी हा खुलासा केला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते. त्यानंतर यावरून बराच गदारोळ उडाला.पवार यांनी याबाबत फेसबूक पोस्टवर म्हटले आहे की, पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला. परंतु तो माज्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदभार्तील धोरणास सर्व राजकीय पक्ष प्रमुखांबरोबर संमती दिली होती.पवार यांनी पुढे म्हटले आहे, भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.
पवारांचा पुलवामा हल्ल्याबाबत यू- टर्न.. माध्यमांवरच केला ‘सर्जिकल स्ट्राईक’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 8:24 PM
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते...
ठळक मुद्देहल्ल्याचा सल्ला नाही संमती : वक्तव्याचा विपर्यास केल्याची टीकाभारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊकलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये,