शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण

By admin | Published: October 11, 2015 3:36 AM

भामरागड पोलिसांसमोर अलीकडेच नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. प्लाटून कमांडर व दलम उपकमांडर असलेल्या या दोघांवरही पोलीस विभागाने १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती

गडचिरोली : भामरागड पोलिसांसमोर अलीकडेच नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. प्लाटून कमांडर व दलम उपकमांडर असलेल्या या दोघांवरही पोलीस विभागाने १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.प्लाटून क्रमांक १८चा कमांडर सुक्कू ऊर्फ महारू राजू मुड्यामी (३२) व त्याची पत्नी भामरागड-गट्टा दलमची उपकमांडर गिरीजा ऊर्फ झुरी पुस्सु मट्टामी (२९) अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. सुक्कू मड्यामी हा २००१मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन २००६पर्यंत सदस्य होता. २००९ साली तो प्लाटून क्रमांक १८चा कमांडर बनला. त्याचबरोबर गिरीजा मट्टामी ही २००२मध्ये भामरागड दलम सदस्य म्हणून भरती झाली. २००५मध्ये येथून तिची बदली होऊन २००७पर्यंत क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनच्या अध्यक्षपदी तिची नेमणूक करण्यात आली. २००९मध्ये तिची पुन्हा भामरागड-गट्टा दलममध्ये बदली करून उपकमांडर म्हणून नेमण्यात आले. नक्षल चळवळीला कंटाळून या जोडप्याने २०१३मध्येच आत्मसमर्पण करण्याची तयारी सुरू केली होती. ही बाब नक्षल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना छत्तीसगड राज्यातील अंबुजमाड येथे पाठविण्यात आले होते. मात्र नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता या जोडप्याने बुधवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुक्कूवर १२ लाखांचे तर गिरीजावर ६ लाखांचे बक्षीस होते. या बक्षिसांचा लाभ त्यांना दिला जाईल. (प्रतिनिधी)