शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

सरीवर सरी; ऊन, दमदार पाऊस आणि गारवा...

By admin | Published: June 10, 2017 1:28 AM

वेगवान वाटचाल करत मान्सून गुरुवारी राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वेगवान वाटचाल करत मान्सून गुरुवारी राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला आहे. गुरुवारी रात्रभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे मुंबापुरीत चांगलाच गारवा निर्माण झाला असून, शुक्रवारी दुपारसह सायंकाळी पडलेल्या पावसाने गारव्यात आणखी भर घातली आहे. दरम्यान, मान्सून आगेकूच करत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबापुरीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. परिणामी उकाड्याने हैराण मुंबईकर दमदार पावसाने आता चांगलेच सुखावणार आहेत.राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणाच्या, अंतर्गत कर्नाटकाच्या, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. गुरुवारी रात्री मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी किंचितशी बरसात केली. त्यानंतर आकाश मोकळे झाल्याने पडलेल्या प्रखर सूर्यकिरणांनी मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला. आणि पुन्हा दुपारी दाटून आलेल्या ढगांनी दुपारसह सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. एकंदर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व दमदार सरींनी दिलासा दिला असून, पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत. आता असाच पाऊस पडत राहो, अन्यथा पुन्हा उकाडा सुरू होईल का, अशी आशंका वाटत असल्याचे मत काही मुंबईकरांनी व्यक्त केले.