शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

पाटबंधारे प्रकल्पासाठी सर्वेक्षण

By admin | Published: September 17, 2015 1:53 AM

लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तेलंगण राज्याने ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत हवाई सर्वेक्षण केले. सध्या हे सर्वेक्षण प्राथमिक अवस्थेत असून ते अंतिम

सिरोंचा (गडचिरोली) : लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तेलंगण राज्याने ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत हवाई सर्वेक्षण केले. सध्या हे सर्वेक्षण प्राथमिक अवस्थेत असून ते अंतिम टप्प्यात आले की अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होईल. मात्र येत्या एक ते दीड महिन्यात तेलंगणचे मुख्यमंत्री कलवकुंटला चंद्रशेखर राव प्रस्तावित प्रकल्पस्थळी कोनशीला न्यास करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. मागील चार दिवसांचे हवाई सर्वेक्षण तेलंगण राज्यातील अंबडपल्ली-मेडीगड्डा लिप्ट इरिगेशन प्रोजेक्टसाठी झाले. या प्रकल्पामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाण्याला नुकसान होणार नाही. या प्रकल्पांतर्गत केवळ पावसाळ्यात वाया जाणारे गढूळ पाणी संकलित होणार आहे. त्यावर आवश्यक प्रक्रिया करून पेयजल व कृषी सिंचन असा दुहेरी हेतू साध्य होणार आहे.प्राणहिता व गोदावरीचे पावसाळ्यातील पाणी राजमुद्रीजवळ अरबी समुद्रात विलीन होते. या दोन्ही नद्यांचा आजतागायत सिरोंचा तालुक्यासह नजीकच्या तालुक्यांना कृषी सिंचनासाठी कवडीचाही उपयोग झाला नाही. उलट पूर आणि महापुरामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी)गोदावरी पाणी तंटा लवाद १९८० च्या परिशिष्ट अहवालातील परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट केलेले लेंडी प्रकल्प, लोअर पैनगंगा प्रकल्प आणि प्राणहिता प्रकल्प या तीन सिंचन प्रकल्पांची कामे संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्याचे आंध्र व महाराष्ट्र शासनाने ठरविले होते. तेलंगण राज्य तेव्हा अस्तित्वात नव्हते. लेंडी प्रकल्प व लोअर पैनगंगा प्रकल्पासंबंधित आंतरराज्यीय मुद्दे उभय राज्यांकडून चर्चेद्वारे कार्यान्वित करण्यात आले. प्राणहिता प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी अन्वेषण व सर्वेक्षण केले जाणार होते. हे सर्वेक्षण त्वरित व जलद गतीने सुरू करणे दोन्ही राज्यांना किफायतशीर ठरेल असे सांगण्यात आले होते. आंध्र शासनाने २००८ मध्ये त्या दृष्टीने पाऊल उचलले.