शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

चौकशी आयोगाकडून सावित्री पुलाची पाहणी

By admin | Published: May 13, 2017 2:24 AM

मुंबई - गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : मुंबई - गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने शुक्रवारी अपघातग्रस्त पुलाची पाहणी केली. याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. अपघातानंतर शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर चौफेर टीका झाल्यानंतर, सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक केली. अपघातानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर या निवृत्त न्यायाधीश एस. के. शहा यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली .आयोगाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. त्यावर शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या पुलाच्या अपघातासंदर्भात कुणाकडे काही माहिती असेल, तर ती आयोगापुढे सादर करावी, असे आवाहन आयोगातर्फेकरण्यात आले आहे. या वेळी चौकशी आयोगाचे सचिव एस. आर. खानझोडे, सदस्य अ‍ॅड. डीपन मर्चंट, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, अधीक्षक अभियंता सुभाष तिखीले आदी उपस्थित होते.अपघातग्रस्त पुलाच्या शेजारी नवीन पुलाचे काम सरकारने तातडीने हाती घेतले. हे काम पूर्ण होत आले असले, तरी जुन्या पुलाला झालेला अपघात हा नैसर्गिक आपत्ती होती हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते किंवा नाही, त्याची गरज होती का, या सर्वाचा शोध या चौकशी आयोगाकडून घेतला जाणार आहे. मुंबईच्या आयआयटी संस्थेनेही याबाबतचा अहवाल तयार केला असून, चौकशी आयोगाने तो अहवाल मागवून घेतला आहे.