मुंबई : उपचार साधनांच्या किमती नियंत्रणात आणून किमतींत सुसूत्रता आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन सर्वेक्षण करत आहे. सरकारी, खासगी रुग्णालये, औषधांच्या दुकानांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. रुग्णावर उपचार सुरू असताना औषधांबरोबरच अन्य काही वस्तू आवश्यक असतात. पण, या वस्तूंच्या किमतींमध्ये तफावत आढळून येते. एखादा रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असला, अथवा त्याला संसर्गजन्य आजार झाला असल्यास अशा रुग्णांना भेटण्यासाठी जाताना काही नियम पाळावे लागतात. अशावेळी ग्लोव्हज, कोट, टोपी घालावी लागते. या वस्तूंच्या किमतींमध्ये सुसूत्रता नाही. खासगी रुग्णालये, महापालिका, सरकारी रुग्णालये आणि औषधांच्या दुकानांचा अभ्यास सध्या सुरू आहे. काही ठिकाणची माहिती प्राथमिक पातळीवर गोळा करत असल्याचे सूत्रांकडून समजले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, सध्या सर्वेक्षणाचेकाम सुरू आहे. पण, किमतींमध्ये किती तफावत आहे, याचा अभ्यास अजून सुष् केलेला नाही. संपूर्ण अहवाल तयार होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)किमतीमध्ये तफावत : सरकारी अथवा महापालिका रुग्णालयात या काही वस्तू कमी किमतीत मिळतात. खासगी औषधांच्या दुकानात या वस्तूंच्या किमती वेगळ्या असतात. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन किमतींचे सर्वेक्षण करत आहे.
उपचार साधनांच्या किमतींचे सर्वेक्षण सुरू
By admin | Published: March 16, 2016 8:37 AM