कल्याण - १९७१ सालच्या भारत पाकिस्तान लढ्यात शत्रूच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांना अंगावर झेलून लढा देणाऱ्या भारतीय सैन्य दलातील तत्कालीन सुभेदार सुरजित सिंह भट्टी यांचे नुकतेच दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कश्मीर कौर भट्टी यांच्यासह दोन मूले, तीन मुली व जावई असा परिवार आहे.
मुळचे पंजाब राज्यातील रहिवासी असणारे सुरजितसिंह भट्टी गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली येथे वास्तव्यास होते .आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच देशाप्रेमाखातर ते भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले .त्यानंतर १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रीय सहभाग घेऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
१९८७ साली सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर देखील अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे निर्भीड समाजसेवक म्हणून त्यांनी शेवटपर्यंत आपली ओळख कायम ठेवली .दीर्घआजाराने त्रस्त असताना २६ सप्टेंबर रोजी कुलाबा येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुण्यानुमोदन धार्मिक विधी त्यांचे राहते घर आकार सोसायटी , ए- विंग रूम नंबर २ , आर एच २८,सुदामानगर एमआयडीसी ,डोंबिवली पूर्व , येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भट्टी कुटुंबियांतर्फे कळविण्यात आली आहे .