पुणे : अवकाळी पावसाचे ढग दूर जाताच सोमवारी राज्याच्या तापमानात कमालीची वाढ नोंदवली गेली़ बहुतांश शहरांचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले. अमरावतीमध्ये सर्वाधिक ४३.५, तर नागपूरमध्ये ४३़ ३ अबंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ आगामी २ दिवसांत तापमान वाढण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, जळगावच्या धरणगाव तालुक्यातील अभिमन जगन रोकडे (४७) यांचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. राज्यात चंद्रपूरनंतर नागपूर, वर्धा आणि मालेगावचे तापमान प्रत्येकी ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातील लोहगाव, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या सर्वच शहरांचे कमाल तापमान चाळीस अंशांवर गेले होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीच्या उकाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमान २६ अंशांच्या वर तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान २३ अंशांच्या वर होते.
सूर्यनारायण कोपला!
By admin | Published: April 21, 2015 2:31 AM