शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सूर्यनमस्काराचा वाद चिघळला

By admin | Published: August 27, 2016 1:58 AM

सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यावरून वाद पेटला असताना प्रत्यक्षात महिन्याभरापूर्वीच विद्यार्थी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालत असल्याचे उजेडात आले

मुंबई : पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यावरून वाद पेटला असताना प्रत्यक्षात महिन्याभरापूर्वीच विद्यार्थी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालत असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे हा विरोध राजकीय असल्याचे स्पष्ट झाल्याने समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आता शिक्षण अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी सुरू केली आहे़पालिका शाळांमध्ये दररोज प्रार्थनावेळी योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचा करण्याची भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांची ठरावाची सूचना महासभेत नुकतीच बहुमताने मंजूर झाली़ यावर समाजवादीसह सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला़ समाजवादी पक्षाने यापुढे जात हा निर्णय रद्द होण्यासाठी दबावतंत्र सुरू केले़ मात्र महापालिका शाळांमध्ये २६ जुलैपासून योगाचे प्रशिक्षण दैनंदिन परिपाठ म्हणून सुरू करण्यात आल्याचे समोर आले़असे परिपत्रकच शिक्षण अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी पालिका शाळांना पाठविले होते़ माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून काही शाळांमध्ये सकाळच्या वेळी काही आसने शिकविली जातात़ विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत योगाचे प्रशिक्षण दिले जाते़ याला आतापर्यंत कधीही विरोध होत नव्हता, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले़ (प्रतिनिधी)>आयुक्तांना समाजवादीची नोटीसमुस्लीम धर्मीयांचा सूर्यनमस्काराला विरोध आहे, अशी सक्ती मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी कायदेशीर नोटीस सपाने आयुक्त अजय मेहता यांना पाठविली़ या नोटिशीला सात दिवसांमध्ये सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास न्यायालयीन लढाई लढू, असा इशाराच सपाचे गटनेते यांनी वकिलांमार्फत दिला आहे़निलंबनाची मागणी : शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी गेल्या महिन्यातच परिपत्रक काढून सूर्यनमस्कार पालिका शाळांमध्ये सक्तीचे केले़ गेला महिनाभर विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत असताना विरोध झाला नाही़ ही बाब उघडकीस येताच सपाचे गटनेते रईस शेख यांनी आता शिक्षण अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे़एक लाख विद्यार्थ्यांवर परिणाम : पालिकेच्या चारशे उर्दू माध्यमातील एक लाख विद्यार्थ्यांनाही सूर्यनमस्काराची सक्ती केली आहे़ सूर्यनमस्काराला मुस्लीम धर्मीयांचा विरोध असल्याने या विद्यार्थ्यांवर हा अन्याय का, असा सवाल सपाने केला आहे़वाद पेटणार : पालिका शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी खादी वस्त्र परिधान करण्याची सक्तीचा ठराव भाजपाचे राम बारोट यांनी मांडला आहे़ त्याचबरोबर प्रत्येक विभागात गोशाळा बांधणे अशाही काही मागण्यांवरून वाद पेटण्याची शक्यता आहे़>नगरसेवकांनाही सूर्यनमस्काराची सक्ती- मनसेची मागणीपालिका शाळांमध्ये सूर्यनमस्काराची सक्ती करण्याचा वाद पेटला असताना ऐन निवडणुकीच्या काळात या वादातून आपलीही पोळी शेकून घेण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले आहेत़ विद्यार्थ्यांबरोबरच आता नगरसेवकांनाही प्रत्येक महिन्यात पाच दिवस सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करावी, अशी मागणी मनसेने केली आहे़ विद्यार्थ्यांना सक्ती करताना नगरसेवकांनाही याची जाण असायला हवी, म्हणून ही मागणी करण्यात आल्याचा युक्तिवाद मनसेने केला आहे़ प्रत्येक नगरसेवकाने आपल्या विभागातील पालिका शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर पाच दिवस सूर्यनमस्कार घालावा़ हा नियम न पाळणाऱ्या नगरसेवकाला निलंबित करण्याचीही मागणी मनसेने केली आहे़