मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) NCB ने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते.
अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून रिया आणि तिच्या भावा शिवाय बॉलिवूडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावेही जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवूड पार्टीजमध्ये ड्रग्स घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावरही ड्रग्सचा वापर करणे आणि डिलिंग' करण्याचा आरोप आहे.
सीबीआयकडून रियाचीही चौकशी सुरूच
सीबीआयकडून रियाची चौकशी सातत्याने सुरूच आहे. सीबीआयच्या पथकाने रविवारी जवळपास नऊ तास तिची चौकशी केली, यापूर्वी शनिवारी सात तास चौकशी चालली. तर शुक्रवारीही जवळपास दहा तास तिची चौकशी सुरू होती. आता सीबीआय गुरुवारपासून रियाचा भाऊ शौविकची चोकशी करणार आहे. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनीही रियाची चोकशी केली होती. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) अभिनेत्री रियाची चौकशी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर
सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...
लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"