मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचं सांगत चौकशी अद्याप सुरू आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून यामध्ये आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांत फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुशांतच्या मृत्यूनंतर एक धक्कादायक ट्रेंड पाहायला मिळाला. सोशल मीडियावर त्याच्या मृतदेहाचे काही फोटो हे पोस्ट करण्यात आले. मात्र त्याचे हे फोटो अपलोड करणं महागात पडू शकतं. महाराष्ट्र सायबर सेलने याचा निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. चित्रपटाच्या कलाकारांपासून ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना सुशांतच्या मृतदेहाचे फोटो अपलोड करू नका असं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे. 'सोशल मीडियावर सध्या एक चिंताजनक ट्रेंड दिसत आहे. यात दिवंगत सुशांत सिंह राजपूत यचा फोटो व्हायरल केला जात आहे. हे फारच वाईट आणि त्रासदायक आहे. सोशल मीडियावर असे फोटो पसरवणं कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान एका माजी खासदाराने धक्कादायक विधान केलं आहे. सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
जन अधिकार पक्षाचे नेते आणि बिहारमधील माजी खासदार पप्पू यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. 'सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे' असं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"
CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई
पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी