शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Sushma Andhare : "शिवसेनेचे चिलखत..., मातोश्रीचा गड वाचवण्यासाठी निकराची झुंज"; अंधारेंची राऊतांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:26 AM

Sushma Andhare And Sanjay Raut : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. "शिवसेनेचे चिलखत.... आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी "निष्ठा"दिवस आहे. सामनाच्या संपादकीयमधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत" असं अंधारे यांनी म्हटलं आहे. 

"लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते. सर , ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जिवाच्या आकांताने हा मातोश्रीचा गड वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे" असं सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांबाबत म्हटलं आहे. 

"सन्माननीय संजय राऊत सरशिवसेनेचे चिलखत.... आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी "निष्ठा"दिवस आहे... !!लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते.         ही समष्टी ची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणु. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजुन उमजून सोयीस्कर रित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात.           अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे , प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे माञ मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.         सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती.. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सूड भावनेतून झालेल्या ED च्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही.         आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला... पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही ही उणिव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती.       सामना च्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत.         सर,  ज्यांना बहिण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कार च शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात...   ... अधून मधून जेव्हा ट्रोलींग, दबावतंत्र या मुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते तेव्हा आम्ही आपला, आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्य्या वर्षावहिनी किंवा तुमच्या आईंनी जे सोसलं त्यापुढे हे काहिच नाही.       मध्ये नीलम गोऱ्हे आपली उपसभापती पदाची खुर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करुन गेल्या. पण आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना , मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते असे सांगीतले तेव्हा माञ निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा  शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणुन आनंदच व्यक्त केला हे उल्लेखनीय आहे.सर , ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जिवाच्या आकांताने हा मातोश्रीचा गड वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेल मधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही हा विचार करुन हार मानणारी शाऊटींग ब्रिगेड, अन् मातोश्रीने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात.        आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.आपली लहान बहीणसुषमा" असं सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेSanjay Rautसंजय राऊत