धुळे : लग्नाचे आमिष दाखवून अकलाड (ता. धुळे) येथून तीन मुलींना पळवून नेल्या प्रकरणात मदत करणार्या संशयित महिलेला अटक झाली. तिला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. अकलाड येथे राहणार्या तीन मुलींशी जगदीश मकन पाटील (रा. मोराणे प्र.नेर, ता. धुळे), आबा पावबा पाटील, आनंद शिवा ठाकरे (रा. अकलाड, ता. धुळे) यांनी गावातीलच तीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून रविवारी पळवून नेले. या कामात सिंधूबाई अण्णा मोरे हिने त्यांना मदत केल्याचा संशय आहे. याप्रकरणी सिंधूबाईला पोलिसांनी अटक केली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सिंधूबाईला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. पळवून नेलेल्या तीन मुली व संशयित युवकांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान अकलाड येथील तिघा युवकांनी तिघा मुलींना एका खासगी कारमध्ये घेऊन पलायन केले आहे. त्यांनी ती कार शिरपूर येथे सोडून पुढे दुसर्या वाहनाने प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
संशयित महिलेस तीन दिवस कोठडी
By admin | Published: May 10, 2014 7:09 PM