शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

संपात सहभागी झालेल्या सोलापूरच्या ११२ निवासी डॉक्टरांचे निलंबन

By admin | Published: March 22, 2017 5:28 PM

राजाराम पोवार: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई

संपात सहभागी झालेल्या सोलापूरच्या ११२ निवासी डॉक्टरांचे निलंबनराजाराम पोवार: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाईसोलापूर: डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन वैद्यकीय महािवद्यालयाच्या डॉक्टरांचाही यात सहभाग आहे. संबंधितांना नोटिसा बजावूनही ते हजर राहिले नसल्याने अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ११२ जणांवर निलंबनाची कारवाई केली. उच्न न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याने त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील डॉक्टरांवर होणारे वाढते हल्ले रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे कारणावरुन आणि आठवड्यात धुळे, नाशिक, सायन, औरंगाबाद येथे अशा घडल्याने निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. याचे थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याने संबंधितांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महािवद्यालय तथा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचेअधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मंगळवारी सकाळी आणि त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता संप मागे घेऊन सेवेत सहभागी होण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्याची दखल न घेतल्याने अधिष्ठाता यांनी आज (बुधवारी) ११२ जणांवर निलंबनाची कारवाई केली. सोलापूच्या शासकीय रुग्णालयात एकूण १७७ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. यापैकी ११२ जणांनी संपामध्ये सहभाग घेतला होता. अन्य ६५ निवासी डॉक्टर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. रुग्णालयातील दररोज हजााहून अधिक रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यासाठी वर्दळ असते. त्या दृष्टीने रुग्णांची गैरसोय होऊ यासाठी संप करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय रुग्णालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे डॉ, पोवार यांनी स्पष्ट केले.------------------रुग्णालय प्रशासनाचे नियोजनदरम्यान, शासकीय रुग्णालयातील रुग्णांवर या संपाचा परिणाम होऊ नये यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील पूुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, सहा प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, कार्यरत असलेले ६५ निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने नियोजन आखले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार सुरु आहेत. सर्वांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील तातडीचे रुग्ण वगळता सामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयाकडे पाठवू नये अशा सूचना दिल्या आहेत, असे अधिष्ठाता पोवार यांनी स्पष्ट केले. ----------------------------काय होणार पुढील कारवाई निलंबवाची कारवाई केलेल्या डॉक्टरांवर पुढील टप्पा म्हणून त्यांचे रजिस्ट्रेन रद्द, मानधन न देणे अशी कारवाईचे पाऊस शासनाकडून उचलले जाऊ शकते असेही सांगण्यात आले.