शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

महानंद संचालक मंडळ बरखास्तीला स्थगिती

By admin | Published: October 28, 2015 1:51 AM

गणपूर्ती न झाल्याने महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या राज्य सरकारच्या २८ सप्टेंबरच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने ६ आॅक्टोबर रोजी दोन आठवड्यांची स्थगिती दिली होती

मुंबई : गणपूर्ती न झाल्याने महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या राज्य सरकारच्या २८ सप्टेंबरच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने ६ आॅक्टोबर रोजी दोन आठवड्यांची स्थगिती दिली होती. मात्र राज्य सरकारने वेळेत भूमिका स्पष्ट न केल्याने उच्च न्यायालयाने ही स्थगिती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली.महानंदच्या संचालक मंडळाच्या ११ संचालकांनी प्रत्यक्षात राजीनामे न देता केवळ त्यांच्या वकिलांनी केलेल्या विधानावरून संबंधितांनी राजीनामे दिले, असे सरकारने गृहीत धरले. त्यामुळे महानंदच्या संचालक मंडळाची ५१ टक्के गणपूर्ती होत नाही, असे कारण देत २८ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने महानंदचे संचालक मंडळ बरखास्त केले. या निर्णयाला ११ संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही सुनावणी न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे होती. न्या. मेनन यांनी ६ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती दिली. मात्र मंगळवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती न्या. मेनन यांना केली. सरकारी वकिलांची विनंती मान्य करत राज्य सरकारच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाला दिलेली स्थगिती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवत या याचिकांवरील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी ठेवली.