शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धाब्यावर बसविणारे निलंबित

By admin | Published: January 15, 2016 1:37 AM

मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी

- यदु जोशी,  मुंबईमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर सोडाच, पण हद्दीचा वाद उपस्थित करून चालढकल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत: मुख्यमंत्र्यांनी अशी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिणामी, गृहविभागातील कक्ष अधिकारी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याची बाब समोर आली होती. विधानसभेत या बाबत प्रचंड गदारोळ झाला होता. आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण होते. या घोटाळ्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी विशेष कृती दल (एसटीएफ) नेमण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने गृहविभागाला तसे लेखी कळविलेदेखील होते. प्रत्यक्षात वर्ष उलटले, तरी असे कृती दल नेमण्यातच आले नाही. उलट हा विषय गृहविभागातील कोणत्या उपसचिवांच्या कार्यकक्षेत येतो, यावर घोळ घालण्यात आला. त्यात काही महिने निघून गेले. नंतर वेगवेगळ्या विभागांकडून अभिप्राय मागविण्याचे सोपस्कार करण्यात वेळ घालविला. वर्षभरानंतर असे कृती दल स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव कासवगतीने मुख्यमंत्र्यांसमोर आला. आपणच दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अशी अवस्था असल्याचे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्री संतप्त झाले व कृती दल तातडीने स्थापन करण्याबरोबरच या दिरंगाईला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. जीआरचा आढावा घेणारराज्य शासन एकामागे एक जीआर काढते, पण त्यांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा आढावाच घेतला जात नाही. आता मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी असा आढावा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जीआरचा संबंधित वर्गाला कितपत फायदा झाला, याचे आॅडिटिंग होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांची नाराजीशासकीय योजना, निर्णयांची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. सरकारी अधिकारी ऐकत नाहीत, अशी भावना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी वेगवेगळे आदेश काढून नोकरशाही गतिमान करण्याचा निर्धार केला आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात गलथानपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.