मुंबई : शंभर टक्के अनुदानाची मागणी करीत गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अपंग विद्यार्थी शिक्षकांनी 15 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 8 दिवसांत अनुदानाच्या मागणीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती अपंग शाळा संस्थापक व कर्मचारी संघाने दिली आहे.
याआधी राज्यातील कायम विनाअनुदानित अपंग विशेष शाळांतील ‘कायम’ शब्द काढण्याची मागणी करीत राज्यातील अपंग विशेष शाळांतील शेकडो शिक्षक आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले होते. कायम शब्द काढण्यासह 1क्क् टक्के अनुदान देण्याची मागणीही संघटनेने केली होती. अनुदानामुळे राज्यातील 2क्क्2 पूर्वीच्या 922 अपंग शाळांना संजीवनी मिळेल, असे संघाचे अध्यक्ष पंचरत्न राजपाल यांनी सांगितले. शाळा वाचल्या तर त्याचा थेट फायदा हा त्यात शिकणा:या 5क् हजार अपंग विद्याथ्र्याना होईल, असेही त्यांनी सांगितले. कायम हा शब्द काढल्यास 3 वर्षापूर्वीच्या अपंग शाळांना 1क्क् टक्के अनुदान मिळणार आहे. राज्य शासनाने 12 वर्षापूर्वीच कायम विनाअनुदानित अपंग शाळांना मान्यता देणो बंद केले आहे. म्हणजेच 12 वर्षापासूून सुरू असलेल्या सर्व 922 शाळांना अनुदानाचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
..तर आत्मदहन करणार
922 अपंग शाळांना 1क्क् टक्के अनुदान देण्यासाठी एकूण येणा:या खर्चाची चौकशी केल्यानंतर बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र या कामासाठी संघाने मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांची मुदत देण्याचे ठरवले आहे. मात्र त्यापूर्वी प्रस्ताव मान्य झाला नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष पंचरत्न राजपाल यांनी दिला.