खातिया : चक्रवर्ती वादळामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये घराचे छत उडाले. यात अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गोंदिया तालुक्यातील १ कोटी ४३ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिली.या नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या बुधवारी चक्रीवादळामुळे पूर्णपणे छत नुकसानग्रस्त झालेल्या साझा क्रमांक ३७ तलाठी कार्यालयांतर्गत खातिया, अर्जुनी, बिरसी कॅम्प या गावात झालेल्या नुकसानीचा अहवाल तलाठी आर.एस. बोडखे यांच्यातर्फे तयार करण्यात आला. या आपदग्रस्तांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्वरित खाऊटी धनादेश वाटप करण्याबाबत आदेश दिले. आदेशानुसार उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्या दिशानिर्देशानुसार नायब तहसीलदार सोमनाथ माळी व तलाठी राजेश बोडखे यांनी तिन्ही गावातील आपादग्रस्तांना धनादेश वाटप केले. यामध्ये खातिया येथील पारबता राजाराम नान्हे, अर्जुनी येथील सुमित्रा गजभिये, बिरसी कॅम्प येथील झरना कर्मकर सह इतर लोकांना खाऊटी धनादेश वाटप करण्यात आले. कामठा येथील शेतकरी धनीराम भाजीपाले यांच्या शेतामध्ये लाखो रुपयाचे पपई, आंबे, शेवग्याच्या शेंगाचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसान भरपाई व मदत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रामप्रसादसिंह पनेले, खातिया येथील उपसरपंच सुरजलाल खोटेले यांनी केली आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याना थोडी फार मदन मिळणे आवश्यक आहे. अशा वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेले धानाचे पीक, फळे-भाजी, आंबे यांचे नुकसान होत आहे. २१ मेला आलेल्या वादळामुळे लोकाची घराची छते पूर्णपणे उडून गेली.(वार्ताहर)
दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन
By admin | Published: May 29, 2016 2:05 AM