मुंबई - माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाचा संशय बळावत चालला आहे. मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटेंचा मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचं पत्नी ज्योती मेटे यांनी सांगत एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असा संशय मेटेंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. मेटे अपघातात गंभीर जखमी झाले त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर १ तास कुणी मदतीसाठी आले नाही असं मेटेंच्या वाहनाचा चालक एकनाथ कदम याने म्हटलं. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमी मेटेंना कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु विनायक मेटेंची तपासणी केली असता डॉक्टरांनी मेटेंना मृत घोषित केले. मेटेंच्या अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यात ३ ऑगस्टलाही मेटेंच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला होता असा आरोप शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे.
मेटे यांच्या घातपाताचा ३ ऑगस्ट रोजी प्रयत्न?विनायक मेटे यांच्या अपघाची मृत्युची चौकशी सुरू असतानाच अण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात मायकर सांगतात की, ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पांढऱ्या रंगाच्या कारने शिक्रापूरजवळ (जि. पुणे) पाठलाग केला होता. वाहनात पाच ते सहा लोक बसलेले होते. मागे-पुढे गाडी करीत होते, तर टेम्पो हा आमच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.
मेटेंच्या वाहन चालकालाही ताब्यात घेणारविनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात या अँगलनं पोलीस तपास करत आहेत. त्यात आता मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय बळावला आहे.