अहमदनगर : दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.सरकारला ट्रेन चालविता येत नसेल तर बुलेट ट्रेन कशी चालविणार, असा प्रश्न करत या घटनेबाबत ग्राहक मंच तसेच पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. शेवगाव गोळीबारात जखमी झालेल्या शेतकºयांची भेट घेण्यासाठी तसेच घोटण येथील ऊस उत्पादकांच्या मेळाव्यासाठी शेट्टी नगर दौºयावर आले होते. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.कर्जमाफीचा बट्ट्याबोळशेतकरी कर्जमाफीबाबत आॅनलाइन सर्व्हे करण्याची जबाबदारी सरकारच्या आयटी कंपनीची होती. या कंपनीकडून मुख्यमंत्र्यांच्या पी.ए. शी संबंधित ‘इनोव्हा’ कंपनीला हे काम दिले गेले. त्यांनीही इतर कंपन्या नेमल्या.या कंपन्यांना कर्ज कोणत्या प्रकारचे असते याचेही ज्ञान नव्हते. त्यामुळे बँका या सर्वेक्षणाला वैतागल्या. शेतकºयांची गोपनीय माहिती घेतली गेली. या कंपन्यांमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा झाला, अशी टीका शेट्टी यांनी केली.कारखान्यांत सीसीटीव्ही बसवानगरचे कारखानदार साखर चोरतात म्हणून उतारा घटतो, असा आरोप त्यांनी केला. सर्व कारखान्यांतील इलेक्ट्रॉनिक वजन काटे एकत्रित जोडले पाहिजेत तसेच गेटपासून ते गोदामांपर्यंत सीसीटीव्ही बसवून त्याचे फुटेज शेतकºयांसाठी उपलब्ध केले, तर साखरेची चोरी थांबेल, असे ते म्हणाले. साखर कारखानदार भाजपासाठी पवित्र झाले आहेत. सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते राहिलेले नसल्याचे ते म्हणाले.
गुजरात निवडणुकीमुळे ट्रेन वळविल्याचा संशय - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 5:00 AM