शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी,

By admin | Published: February 15, 2017 7:49 PM

राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत

नाशिक : राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत असून, काल बुधवारी (दि.१५) नाशिकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक गट व एक गण वगळता जिल्हा परिषदेच्या ७२ गट व १४५ गणांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे सरकारातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरून पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतूरा सुरू असतानाच स्वाभीमानीने शिवसेनेला जवळ करीत भाजपाला दणका दिला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारातील घटक पक्षांनी या निवडणूकीत भाजपाकडे काही जागा मागितल्या होत्या. त्या न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. तथापि, भाजपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपा विरूध्द स्वतंत्र भूमिका जाहिर करण्यात येईल असे, हंसराज वडघुले यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटातून शिवनाथ जाधव व सिन्नर तालुक्यातील पांगरी गणातून रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व गट व गणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप यावेळी गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी केला. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका शेतकरी वर्गात आहे. वर्षभरात कांदा तसेच विविध भाजीपाला पिकांना मातीमोल भाव आहे.