ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर दहीहंडीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत होता. मात्र या दहीहंडीला उत्सवाला गालबोट लागलं आहे. दिवसभर ठिकठिकाणच्या दहीहंडी फोडून घराकडे परतलेल्या 25 वर्षीय स्वप्नील खोबरेकरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दहीहंडी मंडळातील मित्रांसोबत गप्पा मारत असताना तो लोखंडी खांबाला चिटकून उभा होता. त्याच दरम्यान खांबातून अचानकपणे वीज प्रवाहित झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला. या घटनेने वाकोला परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयाबाहेर २००पेक्षा जास्त जणांच्या जमावाने गर्दी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करत आहेत.