Maharashtra Politics: सध्या राज्याच्या राजकारणात अनेकविध विषयांवरून कलगीतुरा रंगताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु असून, आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संभाजीराजे यांनी सूचक उत्तर दिले.
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य ही संकल्पना घेऊन संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्रात संघटना वाढवत आहे. नागरिकांनाचा वाढता प्रतिसाद पाहता संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी खेड्या पाड्यातील नागरिक करीत असल्याची राजकीय वर्तुळात सुरू आहे. माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मला खासदारकी मिळाली ती मी घेतली
आरोग्य, शेती आणि शिक्षण या प्रमुख मुद्द्यांना घेऊन संभाजीराजे नागरिकांना भेटत आहे. संभाजीराजे म्हणाले, मला राजकारणात पडायचे नाही पण सत्ता मिळाली तर कुणाला नको असते. मला खासदारकी मिळाली ती मी घेतली. पण सत्ता हे एक टूल आहे. त्यातून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार असतील तर सत्तेत जायला कुणाला आवडणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भूमिका घेतली होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले होते. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून गावागावात जाऊन संभाजीराजे सर्वसामान्य नागरिकांना भेटत आहे. शिव-शाहुंचे वंशज असल्याने नागरिक मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करत आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्याचे म्हटले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"