शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विखे-पाटलांची पणती स्वीडनच्या पंतप्रधानांची सल्लागार

By admin | Published: January 25, 2016 3:00 AM

अहमदनगर जिल्ह्णातील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाली आहे

मुंबई : अहमदनगर जिल्ह्णातील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाली आहे. अनेक शिक्षण संस्था चालविणाऱ्या अशोक विखे-पाटील यांची ती कन्या, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुतणी आहे.३० वर्षीय नीला २०१४ सालापासून स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासोबत काम करीत आहे. तर २०१२ सालापासून ती सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे काम करीत आहे, असे अशोक विखे-पाटील यांनी सांगितले. आता पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून ती करप्रणाली, स्त्री-पुरुष धोरण आणि विकास आदीचा कारभार पाहणार आहे. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला हिने बालपणीचा काही काळ अहमदनगरमध्ये घालविला. तिने गुटेनबर्ग वाणिज्य विद्यापीठातून वाणिज्य व कायदा विषयांत पदवी आणि एमबीए केले आहे. तसेच माद्रिद येथील कॉम्प्युटेंस विद्यापीठातूनही एमबीए केले आहे. नीला ग्रीन पार्टी कार्यकारी मंडळाची सदस्या होती. (प्रतिनिधी)