शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 1:55 AM

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले.

मुंबई : गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूने १७ बळी गेले आहेत. तर पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या कालावधीत ३ लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी ४ हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच, स्वाइन फ्लूच्या १४५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.स्वाइन फ्लू संदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेय स्तरावर जनजागृती मोहीम घेणे, आदी सर्वंकष कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयातील बैठकीत ते बोलत होते.स्वाइन फ्लूसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश तयार करून स्वाइन फ्लू कसा पसरतो, त्याची लक्षणे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी आदी माहिती सर्वसामान्यांना द्यावी. त्याचबरोबर सर्व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी नर्सेस, आरोग्यसेवक यांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे, आदी निर्देश या वेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.गोळ्यांचा पुरेसा साठास्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात असून प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. स्वाइन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू