शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अमरावती विभागास ‘स्वाइन फ्लू’चा विळखा!

By admin | Published: May 01, 2017 2:01 AM

चार जिल्ह्यांत १६ रुग्ण दगावले : ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा आकडाही वाढताच!

अकोला : प्रचंड उष्णतामान असतानाही अमरावती विभागात ‘स्वाइन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने प्रसार होत असून, विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत या आजाराची लागण झाल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे ५७ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळले असून, या जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी चार, तर वाशिम जिल्ह्यातील एका जणाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. स्वाइन फ्लू हा सामान्य आजार असला, तरी प्रतिकारशक्ती कमजोर असलेल्या व्यक्ती या आजाराचे सहज लक्ष्य ठरतात. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा प्रसार थांबू शकतो. ११ हजारांवर नागरिकांची स्क्रिनिंगआरोग्य विभागाकडून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत ११,७९७ लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. यामध्ये ३४२ जण संशयित आढळले असून, त्यापैकी १८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.आरोग्य यंत्रणा सज्जस्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सरसावली असून, खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आल्या असून, सर्वच जिल्ह्यांमध्ये टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असली, तरी नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळता येऊ शकतो. लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे. - डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.